-->

फिट इंडिया प्रश्न मंजुषा २०२२  शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे  ऑनलाईन नोंदणी आवश्यक  क्रीडा विभागाचे आवाहन

फिट इंडिया प्रश्न मंजुषा २०२२ शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे ऑनलाईन नोंदणी आवश्यक क्रीडा विभागाचे आवाहन



साप्ताहिक सागर आदित्य 

फिट इंडिया प्रश्न मंजुषा २०२२

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

ऑनलाईन नोंदणी आवश्यक

क्रीडा विभागाचे आवाहन

वाशिम, क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत फिट इंडिया प्रश्न मंजुषा २०२२ मध्ये शाळास्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांची बौध्दीक कार्यक्षमता वृध्दींगत व्हावी या उद्देशाने फिट इंडिया प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात येत आहे. 

              जिल्हयातील शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य यांनी शाळेच्या UDIE क्रमांकासह ई-मेल समावेश करून विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे.प्रवेश फी ५० रुपये ऑनलाईन भरावयाचे आहे.फिट इंडिया प्रश्न मंजुषाचे ३ स्तर असून राष्ट्रीयस्तर हा अंतिम ठेवण्यात

आलेला आहे.स्तर अ मध्ये नव्याने आलेल्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार १५ नोव्हेंबरपर्यत शाळेतील

केवळ २ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवयाचा आहे.त्यासाठी https://fitindia.nta.ac.in/ या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. स्तर ब प्राथमिक फेरीच्या बॅचमध्ये मोबाईल बेसबर चाचणी होईल.या चाचणीमध्ये ६० प्रश्न असून त्याचा कालावधी ३० मिनिटांचा राहील.

        पुढील स्तर क मध्ये डिसेंबर, २०२२ या महिन्यात राज्यातील विविध शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.नंतर राज्यातील गुणवंत विद्यार्थी हे अंतिम फेरीत सहभागी होतील.अंतिम फेरी ही राष्ट्रीय स्तरावरील राहील.त्यामध्ये देशातील ३६ राज्यातील गुणवंताचा सहभाग राहील. त्या प्रश्नमंजुषामधुन राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थी निवडला जाईल.प्रश्न मंजुषा फेरीत बक्षिसांची एकूण रक्कम ३ कोटी २५ लक्ष एवढी आहे. 

      प्राथमिक फेरीतील विजेत्यास रु.२ हजार तर शाळेला १५ हजार, राज्यस्तरावरील दुसऱ्या उपविजेत्यास ५ हजार तर शाळेस ५० हजार एवढी रक्कम बक्षीस मिळणार आहे.

राज्यस्तरावरील पहिल्या उपविजेत्यास १० हजार तर शाळेस रु.१ लक्ष आणि राज्यस्तर विजेत्यास रु. २५ हजार तर शाळेस रु. २ लक्ष ५० हजार बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

राष्ट्रीयस्तरावरील दुसऱ्या विजेत्यास १ लक्ष तर शाळेस १० लक्ष , राष्ट्रीयस्तरावरील

पहिल्या उपविजेत्यास रु. १ लक्ष ५० हजार तर शाळेस रु. १५ लक्ष बक्षीस देण्यात येईल.

         अंतीम राष्ट्रीय विजेत्यास रु.२ लक्ष ५० हजार तर शाळेस.२५ लक्ष रुपये बक्षीस देण्यात येईल.अंतीम

प्रश्नमंजुषा स्पर्धा जानेवरी २०२३ मध्ये संपन्न होणार आहे.या राष्ट्रीय प्रश्नमंजुषामध्ये विद्यार्थ्याच्या स्पर्धकांच्या शारिरिक हालचाली या बाबीचा समावेश करण्यात आला आहे.अंतीम फेरीचे विश्लेषन राष्ट्रीय स्तरावरुन प्रसारण करण्यात येणार आहे.तरी जिल्हयातील शाळा, महाविद्यालय,मुख्याध्यापक,प्राचार्य यांनी फिट इंडिया प्रश्नमंजुषा २०२२ मध्ये सहभाग व्हावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.

Related Posts

0 Response to "फिट इंडिया प्रश्न मंजुषा २०२२ शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे ऑनलाईन नोंदणी आवश्यक क्रीडा विभागाचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article