-->

ऑनलाईन रोजगार मेळावा 22 ते 24 जुलै रोजी  सोमवारी ऑफलाईन मेळावा

ऑनलाईन रोजगार मेळावा 22 ते 24 जुलै रोजी सोमवारी ऑफलाईन मेळावा

 150 रिक्तपदांवर रोजगाराच्या संधी




साप्ताहिक सागर आदित्य 

ऑनलाईन रोजगार मेळावा 22 ते 24 जुलै रोजी

सोमवारी ऑफलाईन मेळावा

       वाशिम,  : राज्यातील नामांकित नियोक्तांकडुन प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, वाशिमकडून पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २२ ते २४ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. जे उमेदवार प्रत्यक्ष रोजगार मेळयाव्याला उपस्थित राहू शकत नाही त्यांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्याला २५ जुलै रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी एरिया, अमानी, मालेगांव येथे उपस्थित राहावे.

         या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जिल्हयासह राज्यातील नामांकित आस्थापना/कंपन्यांमध्ये १५० रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी जिल्हयातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्राप्त होणार आहे.  त्या अनुषंगाने जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. रोजगार मेळाव्यात इयत्ता १० वी, १२ वी, स्थापत्य पदविका, कृषी पदविका व इतर सर्वशाखीय पदवीधर असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्ड (एम्पॉलमेंट कार्ड) च्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. सहभागी झालेल्या उमेदवारांची उद्योजकांकडून ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.

         जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी २२ ते २४ जुलै २०२२ रोजी आयोजित ऑनलाईन रोजगार मेळाव्यात तर २५ जुलै रोजी आयोजित ऑफलाईन रोजगार मेळाव्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी एरिया, अमानी, मालेगांव येथे उपस्थित राहावे. या मेळाव्यात पसंतीक्रम/ सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

        या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी एम्पलॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअरवर क्लिक करावे. येथे वाशिम जिल्हा निवडुन त्यातील WASHIM JOB FAIR-1 २२ ते २४ जुलै २०२२ मध्ये नमुद पात्रतेनुसारच्या पदांवर अप्लाय करावे. त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल. या पध्दतीने आपण रोजगार मेळाव्यात सहभागी झालेले असाल. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या 07252-231494 या दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Posts

0 Response to "ऑनलाईन रोजगार मेळावा 22 ते 24 जुलै रोजी सोमवारी ऑफलाईन मेळावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article