-->

जिल्हाधिकार्‍यांनी केली पिकांची व इमारत बांधकामांची पाहणी

जिल्हाधिकार्‍यांनी केली पिकांची व इमारत बांधकामांची पाहणी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हाधिकार्‍यांनी केली पिकांची व इमारत बांधकामांची पाहणी 

वाशिम  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज २२ जुलै रोजी मंगरूळपीर  येथे  जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या पशु चिकित्सालय व तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.तातडीने इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तहसील कार्यालय परिसरात बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या बांधकामाची देखील पाहणी केली. बांधकामास विलंब झाला असून हे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

           तालुक्यातील मोहरी शिवारात काही शेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची श्री.षण्मुगराजन यांनी पाहणी केली.शेतात आता पाणी साचत नसल्याने व पीक चांगले बहरले असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मंगरुळपीर तालुक्यात या खरीप हंगामात २५ टक्के बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्याचे कृषी अधिकारी यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. शिवणीजवळून वाहणाऱ्या अडाण  नदीवर बांधण्यात आलेल्या सदोष बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने पिकांचे नुकसान झाल्याची बाब उपस्थित काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले हे बंधारे दुरुस्त करून नव्याने बांधण्यात यावे.अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी यांचेकडे केली. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार शीतल बंडगर  उपस्थित होत्या.

             कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार गावाच्या परिसरात संततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी करून उपस्थित शेतकऱ्यांची संवाद साधला व नुकसानीची माहिती जाणून घेतली. जंगली जनावरांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे काही शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.कारंजा येथे तहसील कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामादेखील त्यांनी पाहणी केली.यावेळी तहसीलदार धीरज मांजरे प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "जिल्हाधिकार्‍यांनी केली पिकांची व इमारत बांधकामांची पाहणी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article