
वन्यप्राण्याचा बंदोबस्त करून मौजे तोरणाळा येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी
साप्ताहिक सागर आदित्य
वन्यप्राण्याचा बंदोबस्त करून मौजे तोरणाळा येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी वनपरिक्षेत्र अधिकारी वाशिम यांना दिले निवेदन - गोपाल भिसडे
वाशिम जिल्हातील मौजे तोरणाळा गावातील संपूर्ण पिकाचे रोही वन्यप्राण्यांनी मोठया प्रमाणात नुकसान केल्याबद्दल सर्व खरीप पिकाचे संपूर्ण गावात मोठया प्रमाणात नुकसान झाल्या बद्दल पिकाची नुकसान भरपाई मिळण्या बाबत सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी गोपाल भिसडे यांनी केली आहे मागील काही दिवसात मुसळधार पाण्याच्या थैमानाने पिकाचे नुकसान झाले, दुबार पेरणी होऊनही संपूर्ण वन्यप्राण्यांनी मोठया प्रमाणात नुकसान केले आहे, तरी अशावेळी या सर्व शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे, तरी प्रशासनाने लवकरात लवकर विलंब न करता रोहीचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी समस्त ग्रामस्थ तोरणाळा येथील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे,,यावेळी सचिन मुठाळ,विनोद मुठाळ, तुळशीराम मुठाळ, अरुण मुठाळ, केशव मुठाळ, आनंदा मुठाळ, दत्ता मुठाळ, जनार्धन मुठाळ, अजय मुठाळ आदी सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते,,
0 Response to "वन्यप्राण्याचा बंदोबस्त करून मौजे तोरणाळा येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी "
Post a Comment