
30 जुलैपर्यंत अनुभवी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले
साप्ताहिक सागर आदित्य
30 जुलैपर्यंत अनुभवी स्वयंसेवी संस्थांकडून
प्रस्ताव मागविले
वाशिम, : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरीता प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व व अनुरक्षण या संस्थेतर सेवांच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढण्यात आला आहे. शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व व अनुरक्षण या संस्थेस्तर सेवांच्या अंमलबजावणीसाठी दोन स्वयंसेवी संस्थेतील दोन प्रतिनिधींची जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरुन निवड करण्यात येणार आहे. ज्या संस्थांना बाल कल्याण क्षेत्रातील अनुभव आहे किंवा कुटूंब सक्षमीकरण किंवा समाजातील बालकांच्या विकासाकरीता संस्थाबाहय कार्यक्रम राबवित असलेल्या संस्थांनी आपले प्रस्ताव 30 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम येथे सादर करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
0 Response to "30 जुलैपर्यंत अनुभवी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविले"
Post a Comment