-->

छायाचित्रासह मतदार यादीचा  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

छायाचित्रासह मतदार यादीचा

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

वाशिम,   भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे.

          9 नोव्हेंबर 2022- एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी  प्रसिध्द करणे. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022- दावे व हरकती स्विकारणे. 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर 2022-विशेष मोहिमांचा कालावधी. 26 डिसेंबर 2022 पर्यंत- दावे व हरकती निकालात काढणे.3 जानेवारी 2023 पर्यत अंतीम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे आणि 5 जानेवारी 2023 रोजी मतदार यादीची अंतीम प्रसिध्दी करण्यात येईल.

       जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामसभेत प्रारुप मतदार यादीचे वाचन, मतदार नोंदणी, नोंदणीतील दुरुस्ती, मय्यत मतदारांच्या याद्या तयार करणे, गावातील मतदार यादीतील नोंदणी झालेल्या मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणीकरण करण्यासाठी त्याचा आधार क्रमांक NVSP,Voter Help Line App व Garuda App व्दारे माहिती गोळा करणे, ऑनलाईन नांव नोंदणीबाबत माहिती देणे, पदवीधर मतदार नोंदणीबाबत माहिती देणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक नमुनेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

       विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत मतदार नोदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या अधिनस्त मतदार नोंदणीसाठी देखील विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

      9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022- विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबीरे,12 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर 2022- महिला व दिव्यांग, यांचे मतदार नोदणीसाठी विशेष शिबीर आणि 26 नोव्हेंबर व 27 नोव्हेबर 2022- तृतीय पंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला आणि घर नसलेल्या भटक्या विमुक्त जमातीसाठी शिबीरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिली.

Related Posts

0 Response to "छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article