-->

"महसूल" विभाग जिल्हा प्रशासनाचा कणा         जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस  महसूल पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ  गुणवंत अधिकारी - कर्मचारी सन्मानित

"महसूल" विभाग जिल्हा प्रशासनाचा कणा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस महसूल पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ गुणवंत अधिकारी - कर्मचारी सन्मानित

 


साप्ताहिक सागर आदित्य 

"महसूल" विभाग जिल्हा प्रशासनाचा कणा

       जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

महसूल पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ

गुणवंत अधिकारी - कर्मचारी सन्मानित


        वाशिम,   प्रत्येक ठिकाणी महसूल विभाग काम करतो. जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या काळात महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून कामे करतात. संपूर्ण जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले.महसुल विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक नागरिकांचा महसूल विभागाशी संबंध येतो. त्यामुळे नागरीकांची कामे करतांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी मितभाषी राहून त्यांना सौजन्याची वागणूक देवून त्यांची कामे वेळेत पूर्ण करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.

       आज १ ऑगस्ट रोजी महसूल दिन पंधरवडा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दराडे, वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर,कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे, यांची उपस्थिती होती. 

       श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, महसूल विभागाच्या कामाची तुलना इतर विभागांशी होवू शकत नाही. मोठे कामे करण्याची जबाबदारी महसूल विभाग सातत्याने पार पाडतो. महसूल विभागाकडून विविध कामे केली जातात. महसूल विभागाचे काम अधिकाधिक चांगले कसे होईल यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रयत्न करावा. सर्वांनी टिम वर्क म्हणून काम करावे. कामात त्रुटी राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. असे त्या म्हणाल्या. 

       जाधव प्रास्ताविकातून म्हणाले, महसूल विभाग शासनाचा मध्यवर्ती विभाग व शासनाचा कणा समजला जातो. १ ॲागस्ट ते ३१ जूलै हे महसूली वर्ष समजले जाते. महसुल सप्ताहात साधारणपणे महसूलाचे उद्दीष्ठ, आकारणी व वसूली या बाबत आढावा घेतला जातो. १९ जूलै २००२ च्या शासन परिपत्रकानुसार पहिला महसूल दिन १ ॲागस्ट २००२ रोजी साजरा करण्यात आला. आता त्याचे स्वरूप व्यापक करून या वर्षी १ ॲागस्ट ते १५ ॲागस्ट महसूल पंधरवाडा साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.            

      देवरे म्हणाले, जिल्हयात मोठ्या प्रमाणात महसूलविषयक कामे करण्यात आली आहे. प्रशासन लोकाभिमुख करण्याचे काम महसूलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले आहे. केवळ महसूल सप्ताहातच नव्हे तर वर्षभर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे. नागरीकांना त्रास होणार नाही. महसूल विभागाबाबत लोकांचे चांगले मत बनावे. कमी वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करुन नागरीकांना न्याय देण्याचे काम महसूल विभागाने करावे. असे ते यावेळी म्हणाले. 

         घुगे म्हणाले, महसूल विभागाशी सर्वांचा संबंध येतो. सर्व समस्यांना न्याय देण्याचे काम महसूल विभाग करतो. आपआपले कौशल्य वापरुन अधिकारी-कर्मचारी न्याय देण्याचे काम करतात. महत्वाचे कार्य करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. हा विभाग शेवटच्या घटकापर्यत पोहचतो. शासनाच्या अनेक योजना व उपक्रम राबविण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. सर्वांचा संबंध महसूल विभागाशी येतो. शासनाचा महसूल यंत्रणेवर विश्वास आहे. त्यामुळेच या विभागावर अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

   श्रीमती देवकर म्हणाल्या, महसुल पंधरवड्यात आपल्याला पंधरा दिवसाची पंधरा काम वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. आणि आपण एकाच दिवसात पंधरा वीस काम करत असतो हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक सुचनेचं इम्प्लिमेंटेशन करून त्याचे मॅनेजमेंट करणे, प्लॅनिंग करणे या सगळ्या आघाड्यांवर महसूल विभाग हा सगळ्यात पुढे असतो. प्रत्येक कर्मचारी खरच खूप चांगलं काम करतात. जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली त्याबद्दल खरंच मी त्यांचे आभार व्यक्त करते. असे त्या यावेळी म्हणाल्या. हवालदार, झाल्टे, राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले. 

          यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे, नायब तहसीलदार रवी राठोड, लघुलेखक वैभव कुलकर्णी, अव्वल कारकून संतोष वंजारे, महसुल सहाय्यक वैभव केंद्रे, तलाठी पी.एम. भीसे, मंडळ अधिकारी पी.एस.पांडे, वाहनचालक किशोर इंगोले, पोलिस पाटील वासुदेव सोनोने, शिपाई विशाल नप्ते, कोतवाल सुदामा जाधव यांचा समावेश आहे.संचालन नायब तहसीलदार श्रीमती अर्चना घोळवे यांनी तर उपस्थितांचे आभार महसुल तहसिलदार प्रिया सुळे यांनी मानले. सहाय्यक अधीक्षक मिरा पुरोहित, सविता डांगे, सुनील घोडे, विधी अधिकारी महेश महामुनी यांच्यासह विविध विभागाचे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



0 Response to ""महसूल" विभाग जिल्हा प्रशासनाचा कणा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस महसूल पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ गुणवंत अधिकारी - कर्मचारी सन्मानित"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article