-->

विकसित भारत संकल्प यात्रा  जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

विकसित भारत संकल्प यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विकसित भारत संकल्प यात्रा

जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ


बसस्थानक परिसरातून यात्रेला सुरूवात 


वाशिम," विकसित भारत संकल्प यात्रा " या मोहिमेचा शुभारंभ आज २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी  विश्वनाथ घुगे,नगरपालीका प्रशासन अधिकारी पंकज सोनवणे,वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड,आकाशवाणीचे नोडल अधिकारी गजानन माळेकर, आकाशवाणी जिल्हा प्रतिनिधी सुनील कांबळे,दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी राम धनगर,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.रणजित सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

         श्री.घुगे यांच्या हस्ते एल.ई.डी फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. 

               विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.घुगे म्हणाले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात नागरिकांना व लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी व पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना या संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.    

             जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या समन्वयातून या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. आज या संकल्प यात्रेचा शुभारंभ एलईडी फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.जिल्ह्यात ४ एलईडी फिरती वाहने उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायत स्तरावर दररोज २ गावात केंद्र शासनाच्या योजनांची प्रचार- प्रसिद्धी आणि शासकीय योजना व त्यांच्या उपलब्धतेबाबत जागरूकता निर्माण करणार आहे. 

                श्री.सोनवणे म्हणाले,या यात्रेदरम्यान प्रचार प्रसिद्धीचे विशेष कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.ग्रामपंचायत पातळीवर विविध विभागांमार्फत राबविलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्रुटी दूर करून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करून गावातच लाभ देण्यात येणार आहे.    

          वाशिम बसस्थानक परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात योजनांची माहिती देऊन करण्यात आली.यावेळी बसस्थानकावरील प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                   या मोहिमेतून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी आयुष्यमान भारत,पीएम आवास योजना,पीएम उज्वला योजना,पीएम विश्वकर्मा योजना,पी.एम.किसान सन्मान योजना,किसान क्रेडिट कार्ड,हर घर जल स्वमित्र योजना,जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना,सुरक्षा विमा योजना,अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम योजना याशिवाय स्कॉलरशिप योजना,एकलव्य मॉडेल निवासी शाळा,वन हक्क अधिकार तर शहरी भागासाठी पीएम स्वनिधी, पी.एम विश्वकर्मा,पीएम उजाला योजना,पीएम मुद्रा योजना,स्टार्ट अप इंडिया,आयुष्यमान भारत,पीएम आवास योजना,स्वच्छ भारत अभियान,सौभाग्य योजना व खेलो इंडिया यासह अन्य योजनांची माहिती व लाभ भविष्यात संबंधित लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

       बसस्थानक परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात करतेवेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,वाशिमचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. 

                सर्व नागरिकांनी उपस्थित राहून विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0 Response to "विकसित भारत संकल्प यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article