
कोजागिरी पौर्णिमा साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
कोजागिरी पौर्णिमा साजरी ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सिव्हिल लाईन वाशिम येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. एक छोटाशा कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक सागर आदित्य चे संपादक प्रकाश पाटील लहाने यांचा सत्कार करण्यात आला. या लक्ष्मीनारायणा ची प्रतिमा देऊन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, सेंटर च्या संचालिका स्वाती दीदी व पार्वती दीदी यांनी केला. सर्वप्रथम गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर स्वाती दिदी च्या हस्ते चिमुकलीचा सत्कार करण्यात आला. स्वाती दीदी, पार्वती दीदी व सर्व परिसरातील कुलभूषण भाऊ-बहिणी उपस्थित होत्या यानिमित्त कोजागिरी पौर्णिमेच्या आध्यात्मिक रहस्य सांगितले त्यानंतर विविध खेळाचा आनंद घेतला आणि त्यानंतर दांडियाचा आनंद घेण्यात आला सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्वती दीदी यांनी केली त्यानंतर सर्वांना दूध घोटून महाप्रसाद देण्यात आला.
0 Response to "कोजागिरी पौर्णिमा साजरी"
Post a Comment