-->

धनगर समाज बांधवांना मागील वर्षी मिळाले 41 घरकुल यावर्षी 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनास सादर

धनगर समाज बांधवांना मागील वर्षी मिळाले 41 घरकुल यावर्षी 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनास सादर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

धनगर समाज बांधवांना मागील वर्षी मिळाले 41 घरकुल यावर्षी 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनास सादर 


वाशीम  धनगर समाज बांधवांसाठी वैयक्तिक लाभाची घरकुल योजना 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाद्वारे सुरू करण्यात आली आहे.राज्यातील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील या समाजातील लोकांसाठी 10 हजार घरकुल देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

                जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च 2022 आणि 26 डिसेंबर 201 रोजी झालेल्या सभेत 12 सप्टेंबर 2022 आणि 13 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार 41 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 27 मार्च 2023 आणि 10 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. प्रत्येक महिन्यात धनगर बांधवांकडून घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज मागविण्यात येतात.तसेच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येते.धनगर समाजातील कोणताही पात्र लाभार्थी हा घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.

0 Response to "धनगर समाज बांधवांना मागील वर्षी मिळाले 41 घरकुल यावर्षी 115 पात्र लाभार्थ्यांची यादी शासनास सादर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article