-->

अस्वच्छ सफाई कामगारांकडून  कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

अस्वच्छ सफाई कामगारांकडून कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अस्वच्छ सफाई कामगारांकडून

कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

        वाशिम,  : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ,नवी दिल्लीकडून अस्वच्छ सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबितांचे पुनर्वसनासाठी 83 कर्ज प्रकरणांचे भौतिक व 3 कोटी 70 लक्ष रुपयाचे आर्थिक उदिष्ट देण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र अस्वच्छ सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबातील 18 ते 50 वर्ष वयोगटातील अर्जदारांनी कर्ज मागणीसाठी अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिकृत https://mpbcdc.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. कर्ज मागणीबाबत आवश्यक अटी व शर्तीची माहिती महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी पात्र व इच्छुक व्यक्तींनी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय येथे संपर्क करावा.असे आवाहन  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे.



Related Posts

0 Response to "अस्वच्छ सफाई कामगारांकडून कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article