
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे
साप्ताहिक सागर आदित्य
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे
वाशिम, सन 2023-24 च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी 48 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण 793 महसूल गावे आहेत.यातील सर्वच 793 गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.
वाशिम तालुक्यात एकूण 131 महसुली गावे आहेत.या सर्व 131 गावांची पैसेवारी 48 पैसे इतकी आहे. मालेगाव तालुक्यातील 122 गावे आहे, या 122 गावांची पैसेवारी 49 पैसे आहे.रिसोड तालुक्यात 100 महसूली गावे असून या सर्व 100 गावांची हंगामी पैसेवारी 47 पैसे आहे. मंगरुळपीर तालुक्यात 137 महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी 47 पैसे आहे. कारंजा तालुक्यात एकूण 167 महसूली गावांची पैसेवारी 47 पैसे आणि मानोरा तालुक्यातील सर्व 136 गावांची पैसेवारी 48 पैसे आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे इतकी आढळून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
0 Response to "खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी 48 पैसे"
Post a Comment