-->

गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या: वसुमना पंत

गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या: वसुमना पंत

 


साप्ताहिक सागर आदित्य 

गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या: वसुमना पंत

१५ सप्टेंबर पासुन जिल्हाभर  स्वच्छता ही सेवा मोहिम

वाशिम दि. 13  

       दरवर्षीप्रमाणे दि. १५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत "स्वच्छता ही सेवा" मोहिमेचे आयोजन करण्यात असुन सर्वांनी गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा  परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. 

त्यानुसार दि. १५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत "स्वच्छता ही सेवा (SHS)” अंतर्गत गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्याबाबतच्या केंद्र व राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. या वर्षी गावांची दृष्यमान स्वच्छता ही या मोहिमेची थीम ठरविण्यात आली आहे. 

मोहिमेदरम्यान काय करावे?

गावामध्ये दृष्यमान स्वच्छता राखली जावी यासाठी गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करावी. गावातील सुका व ओला कचरा विलगीकरणासाठी जनजागृती करावी. प्लॅस्टिक सारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून त्याचे स्वतंत्र नियोजन करावे. पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्याच्या सभोवताली वृक्षारोपण करावे. एकल प्लॅस्टिक वापराच्या (सिंगल युज प्लॅस्टिक) दुष्परिणामाबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी अशा प्लॅस्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी. हागणदारीमुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करावा. गावातील शाळेमध्ये स्वच्छता या विषयावर घोषवाक्य लेखन / प्रतिज्ञा घ्यावी. प्लॅस्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व / निबंध / रांगोळी / सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करावे. सर्व गट विकास अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये याबाबत सतत पाठपुरावा करावा. दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छता रैलीचे आयोजन करण्यात यावे  तसेच दि. ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये महाश्रमदान मोहिम राबविण्यात यावी असे आवाहन सीईओ वसुमना पंत यांनी केले आहे.

        या उपक्रमासाठी शाळेतील मुलांचा स्वच्छता दुत म्हणुन उपयोग करावा. त्यांच्या माध्यमातुन शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करावे यासाठी  शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

Related Posts

0 Response to "गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या: वसुमना पंत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article