
30 जूलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
साप्ताहिक सागर आदित्य
30 जूलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम, 20 जूलै रोजी मोहरम सण साजरा करण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने सवारी, ताजीये,डोले,पंजेची स्थापना होणार आहे.28 ते 30 जूलै दरम्यान मोहरम विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. तसेच जिल्हयात विविध पक्ष/संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्याकरीता धरणे आंदोलने / उपोषणे करण्यात
येत आहेत.
जिल्हा हा सण-उत्सवाचे दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. वरील काळात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे याकरीता 17 ते 30 जूलैपर्यंत संपुर्ण जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहे.
हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह,अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नसल्याचे जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी आदेशात नमूद केले आहे.
0 Response to "30 जूलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश "
Post a Comment