-->

माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना

माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या

माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना


       वाशिम,  :  जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (खेळात/ साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला/ नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी/ यशस्वी उद्योजक/सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे) माजी सैनिक/पत्नी  व पाल्य तसेच शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षात इयत्ता १० वी व १२ वी मध्ये बोर्डात ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी,आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


           तरी विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक/पत्नी व पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसाठी २० सप्टेंबर २०२३ पूर्वी संपर्क साधावा. येतांना आपल्यासोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रीकेची छायांकित प्रत, चालू वर्षात शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत व राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र आणावे. या संधीचा जास्तीत जास्त लाभ माजी सैनिकांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



Related Posts

0 Response to "माजी सैनिक,पत्नी व पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार योजना"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article