-->

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये निवडलेल्या उमेदवारांना  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ऑफर लेटरचे वितरण

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये निवडलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ऑफर लेटरचे वितरण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये निवडलेल्या उमेदवारांना

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ऑफर लेटरचे वितरण


12 सप्टेंबरच्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


       वाशिम,  :  जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा कौशल विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम व मॉडेल करिअर सेंटर यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आयोजित करण्यात येतो. या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजकांद्वारे बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.


           10 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील आत्मा प्रशिक्षण हॉलमध्ये पहिला प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाला. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एकूण 61 रिक्त पदांवर विविध उद्योजकांद्वारे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड करण्यात आली. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एकूण 109 उमेदवारांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यापैकी 27 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.


           निवड करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी प्राथमिक स्वरूपात 4 उमेदवारांना जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. त्यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके, दिपक भोळ्से, आकाश जयस्वाल, संजय उगले, अतिश घुगे व सिद्धेश्वर खेडेकर यांची उपस्थिती होती.


            दुसरा प्लेसमेंट ड्राईव्ह 12 सप्टेंबर 2023 रोजी आत्मा प्रशिक्षण हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी एकूण 65 रिक्तपदे उपलब्ध आहे. इयत्ता 12 वी, पदवीधर, आयटीआय व डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.


           या मेळाव्यात जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवून मेळाव्याच्या दिवशी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. प्लेसमेंट ड्राईव्हबाबत येणाऱ्या अडचणी व अधिक माहितीसाठी आकाश जयस्वाल (७७७५८१४१५३) व दिपक भोळ्से (९७६४७९४०३७) यांच्याशी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०७२५२- २३१४९४ यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.



Related Posts

0 Response to "प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये निवडलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ऑफर लेटरचे वितरण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article