
राजस्थान आर्यन महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा.
साप्ताहिक सागर आदित्य
राजस्थान आर्यन महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा.
राजस्थान आर्यन महाविद्यालयाच्या प्रांगणात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी राजस्थान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,सन्माननीय ठाकुरदास मालाणी , यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. निळकंठअप्पा रावले, समाजसेवक वाशीम, यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. रमेश पगारीया व ॲड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. प्रकाश दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी महाविद्यालयातील 'राष्ट्रीय सेवा योजना' पथक सत्र २०२३-२४ चे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व महाविद्यालयाचे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन २०२२- २३, ४ ×१०० Mts Rly या स्पर्धेमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती मधून तिसरा क्रमांक प्राप्त झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष ठाकुरदास मालाणी ,यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र वितरित करून अभिनंदन करण्यात आले. तसेच 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयाचे कर्मचारी नारायण व्यास, 'वाशीम ते कारगिल' सायकलने २५०० कि.मी. चा प्रवास करण्यास त्यांना रा. शि. मंडळाचे अध्यक्ष, ठाकुरदास मालाणी,यांनी तिरंगा झेंडा दाखवून प्रवासासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश पगारीया,प्राचार्य डॉ. प्रकाश दाभाडे आणि प्राध्यापकवृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. राजस्थान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, ठाकुरदास मालाणी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपस्थिताचे आभार मानले तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ.पी.एस. वानखडे, प्रा. डॉ.एस.ए. पवार व सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.श्रीमती शिलाजी राठी माजी अध्यक्षा व सुधीर राठी सचिव राजस्थान शिक्षण मंडळ वाशिम यांचे मोलाचे मारगदर्शन लाभले
0 Response to "राजस्थान आर्यन महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा."
Post a Comment