
सृष्टी नंदु वाघ हिची नवोदय करिता शहरी मधून निवड! तर गुणानुक्रमे वाशिम जिल्ह्यात ८ नंबरवर आणि ओबीसी मधून जिल्ह्यात प्रथम!
साप्ताहिक सागर आदित्य
सृष्टी नंदु वाघ हिची नवोदय करिता शहरी मधून निवड! तर गुणानुक्रमे वाशिम जिल्ह्यात ८ नंबरवर आणि ओबीसी मधून जिल्ह्यात प्रथम!
जि. प. साखरा शाळेतील 22 मुले नवोदय साठी पात्र
सुष्टी नंदु वाघ या विध्यार्थी नीची सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे
केंद्र शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आणि अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत वाशिम येथील भारतरत्न अटल बिहारी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी यशस्वी झाले असल्याची माहिती सुत्राकडुन प्राप्त झाली आहे.
त्याबद्दल सर्व स्तरातुन नवोदयमध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत होत आहे. विशेषत: मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे आणि माजी शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या साखरा शाळेचे शिक्षक विनोद झनक यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
झनक गुरुजी यांचे सारखे शिक्षक हे वाशिम जिल्ह्याची शान आहेत. जिल्हा परिषदेच्या इतर शिक्षकांनी सुद्धा विनोद झनक गुरुजींप्रमाणे आपल्या मुलांवर मेहनत घेऊन आपल्या शाळेची जास्तीत जास्त मुले नवोदय मध्ये जातील. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही अभिनंदन केले.
“विनोद झनक गुरुजी आणि नवोदय साठी प्रयत्न करणात्या अन्य शाळेतील शिक्षकांचेही मनःपूर्वक अभिनंदन. आपण वाशिम मधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता ज्या सेवा देत आहात त्याचा आम्हा सर्वांस सार्थ अभिमान आहे. यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या जिल्हा परिषदेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक त्यांचे शाळे अंतर्गत येणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये पात्र करण्याकरिता मेहनत घेतील अशी मला आशा वाटते. त्यासोबतच झनक गुरुजी यांच्याकडुन प्रेरणा घेऊन जिल्हा परिषदेच्या इतर सर्व शाळेतील शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्गांनुसार बेरीज, बजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येणे, इंग्रजी व मराठी वाचता येणे या मुलभूत 6 क्षमता उतरवतील अशी आशा आणि अपेक्षा.”
- वैभव वाघमारे (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी
“नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेमधे एकुण संख्येच्या ७०% ते ८०% विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेमधुन पात्र ठरतात ही बाब अतिशय गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागिंन विकासाकरिता आम्ही कटीबध्द आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक गुणवत्तापूर्ण व सुविधायुक्त करण्याकरिता आमचा प्रयत्न आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन.”
- चक्रधर गोटे, माजी सभापती, शिक्षण व आरोग्य
0 Response to "सृष्टी नंदु वाघ हिची नवोदय करिता शहरी मधून निवड! तर गुणानुक्रमे वाशिम जिल्ह्यात ८ नंबरवर आणि ओबीसी मधून जिल्ह्यात प्रथम!"
Post a Comment