-->

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत  कृषि पायाभुत सुविधा निधी योजना  तालुकास्तरावर होणार कार्यशाळा

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत कृषि पायाभुत सुविधा निधी योजना तालुकास्तरावर होणार कार्यशाळा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत

कृषि पायाभुत सुविधा निधी योजना

तालुकास्तरावर होणार कार्यशाळा

          वाशिम,  :  केंद्र सरकार पुरस्कृत “आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत “कृषि पायाभुत सुविधा निधी योजना" ही १६ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कृषी पायाभुत सुविधा निधी योजनेचा प्रचार-प्रसार व लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. कृषी विभाग तसेच सर्व बँकेमार्फत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रीयेसाठी पायाभुत सुविधा प्रकल्पांना २ कोटी रुपयाच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत ७ वर्षाकरीता देण्यात येणार आहे. २ कोटी रुपये पर्यंतच्या कर्जाची पत हमी शासन घेणार आहे. या योजनेमध्ये ८ जुलै २०२० किंवा त्यानंतर कर्ज घेतलेले लाभार्थीसुध्दा या व्याजदर सवलतीसह पात्र राहणार आहेत. या योजनेअंतर्गत प्राथमिक कृषि पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी, संयुक्त उत्तरदायीत्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषि उद्योजक केंद्रीय/ राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रस्तावित केलेले सार्वजनिक/खाजगी भागीदारी प्रकल्प, कृषी उत्पन्न बाजार समिती, बखार महामंडळ, कृषि स्टार्टअप इत्यादींना सहभागी होऊन ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ घेऊ येईल.


           या योजनेचा प्रचार-प्रसिध्दी व नोंदणीकरीता तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयामार्फत तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजीत केलेल्या आहेत. ज्यामध्ये आत्मा, कृषि विभाग आणि विविध बँकेतील अधिकारी याबाबत माहिती तथा नोंदणीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक तालुक्यात याबाबत कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मंगरुळपीर येथे 22 ऑगस्ट, मालेगांव येथे 24 ऑगस्ट,  वाशिम येथे 25 ऑगस्ट, रिसोड येथे 28 ऑगस्ट , मानोरा येथे 29 ऑगस्ट, आणि कारंजा येथे 31 ऑगस्ट 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


           शासनाच्या विविध योजना जसे पोक्रा, स्मार्ट तसेच इतर योजनेंतर्गत काढणी पश्चात प्रकल्पासाठी कर्ज घेतलेले लाभार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहुन एआयएफअंतर्गत ३ टक्के व्याज सवलत करीता नोंदणी करुन अर्ज करावे. या योनजेबाबत तसेच कार्यशाळेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले आहे.

                                                                                                                                              

Related Posts

0 Response to "आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत कृषि पायाभुत सुविधा निधी योजना तालुकास्तरावर होणार कार्यशाळा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article