
व्हॉईस ऑफ मीडिया'च्या मालेगाव शहराध्यक्षपदी अमोल कल्याणकर
साप्ताहिक सागर आदित्य
'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या मालेगाव शहराध्यक्षपदी अमोल कल्याणकर
मालेगाव : तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या मालेगाव शहराध्यक्षपदी अमोल कल्याणकर यांची निवड करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मिडिया या संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांच्या हस्ते अमोल कल्याणकर यांना मालेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकार आणि पत्रकारीतेच्या कल्यासाठी काम करणारी संघटना असून २१ राज्यांत ही संघटना कार्यरत आहे. पत्रकारांची कल्याणकारी संघटना म्हणून ही संघटना देशात कार्यरत असून कोणतेही राजकारण न करता केवळ पत्रकारीता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम ही संघटना करीत आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची घरे उपलब्ध करुन देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे. या संघटनेच्या मालेगाव शहराध्यक्षपदी अमोल कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांच्याहस्ते अमोल कल्याणकर यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
0 Response to "व्हॉईस ऑफ मीडिया'च्या मालेगाव शहराध्यक्षपदी अमोल कल्याणकर "
Post a Comment