-->

कबड्डी असोसिएशनच्या मालेगाव तालुकाध्यक्षपदी संदिप लहाने

कबड्डी असोसिएशनच्या मालेगाव तालुकाध्यक्षपदी संदिप लहाने


 

साप्ताहिक सागर आदित्य 

कबड्डी असोसिएशनच्या मालेगाव तालुकाध्यक्षपदी संदिप लहाने 


मालेगाव : तालुक्यातील तिवळी येथील आदर्श शेतकरी तथा कबड्डीपटू संदिप लहाने यांची विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या मालेगाव तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.    विदर्भ कबड्डी असोसिएशन अध्यक्ष जितूभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष रामभाऊ नवघरे, सचिव डॉ. भागवत महाले, उपाध्यक्ष साहेबराव उगले, माणिकराव खराटे, राजूभाऊ आढाव, आणि असोसिएशच्या पदाधिकाºयांच्या उपस्थिती त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदिप भानुदास लहाने यांना बालपणापासूनच खेळाचे विशेषत: कबड्डीचे विशेष आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी मालेगाव तालुक्यातील अनेक गावखेड्यात तसेच शहरात विदर्भस्तरीय स्पर्धांचे आयोजन करुन तरुणांमध्ये कबड्डीचे प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कबड्डी हा खेळ आपल्या काळ्या मातीचा असून कोणताही खेळ हा जबाबदारी व खिलाडूवृत्तीने खेळावा असे सांगताना संघटनेनी दिलेल जबाबदारी समर्थपणे सांभाळून नव्या दमाचे कबड्डीपटू तयार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मत लहाने यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Related Posts

0 Response to "कबड्डी असोसिएशनच्या मालेगाव तालुकाध्यक्षपदी संदिप लहाने "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article