-->

भूमिपुत्र मांडणार बांधावरील पदवीधरांच्या समस्या : विष्णुपंत भुतेकर

भूमिपुत्र मांडणार बांधावरील पदवीधरांच्या समस्या : विष्णुपंत भुतेकर

 

साप्ताहिक सागर आदित्य 

भूमिपुत्र मांडणार बांधावरील पदवीधरांच्या समस्या : विष्णुपंत भुतेकर

   

वाशिम : अमरावती पदवीधर मतदार संघासाठी येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे. सर्वच उमेदवार प्रचारात दंग आहेत मात्र. शेतकरी असलेल्या पदवी धारकांचा कुणीही विचार करत नाही त्यामुळे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटने करून २७ जानेवारी रोजी बांधावरील पदवीधर ' ह्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता भूमिपुत्र च्या वाशिम कार्यालतात हा कार्यक्रम होणार आहे.

या चर्चासत्रातून शेती आणि शेतीशी निगडीत पदवीधरांचे प्रश्न मांडले  जाणार आहेत अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे.

 मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील व शेतकरी असलेल्या पदवीधर मतदारांच्या  मतदानावर आमदार निवडला जाणार आहे. या मतदारसंघात ३०% ते ३५ % मतदार हे काळया मातीत राबनारे आहेत. पदवीधरांचे आणि सुशिक्षित बेकारांचे प्रश्न हाताळत आसतांना शेतीत राबणारे आणि शेतीच्या बांधावर काम करणार्या पदवीधरांना कायम गृहीत धरण्यात आले आहे. शेतीशी निगडीत पुरक आणि प्रकीया उद्योगासह अनेक पदवीधर छोट-मोठया व्यवसायवर आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे प्रश्न आज पर्य॔त शासन आणि प्रशासनासमोर मांडण्याचा साधा प्रयत्न सुध्दा झाला नाही. पदवी घेऊन घरी पोहोचल्या नंतर लग्न पत्रीकेत कंसात पदवी टाकण्या शिवाय त्याला कुणीही विचारले नाही. विविध पक्ष आणि नेत्यांच्या झेंडे लावुन बेकारी आणि अर्ध बेकारीचे आयुष्य जगणार्या बांधवांनी या वेळेस आपल्या प्रश्नाकडे लक्ष देवुन मतदान करावे म्हणून दि २७ जाने सायंकाळी ६ वाजता भूमिपुत्रच्या वाशिम कार्यालयात   *'बांधावरील पदवीधर'* या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील व अमरावती पदवीधर मतदारसंघातील शेतीत राबनार्या पदवीधरांच्या प्रश्नाला वाचा फोडली जाणार आहे. जिल्ह्य़ातील व जिल्ह्य़ाबाहेरील बांधावरील पदवीधरांनी उपस्थित राहावे अथवा आपले प्रश्न पाठवण्याचे आवाहन भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी केले आहे. बांधावरील पदवीधरांचे प्रश्न आपण पदवीधर मतदारसंघात उभे असलेल्यां उमेदवारांना पाठविले जाणार आहेत. बांधावरील पदवीधर दुर्लक्षीत राहु नये म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे भूमिपुत्र चे जिल्हा प्रवक्ते देव इंगोले यांनी सांगतले आहे.  सर्व उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी उपस्थित राहण्याचे आवाहन व निमंत्रण भूमिपुत्र कडुन दिले जाणार आसल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन डाॅ.जितेंद्र गवळी, उत्तमराव आरू, महाविर पवार , सचिन काकडे, संतोष सुर्वे यांनी केले आहे.

Related Posts

0 Response to "भूमिपुत्र मांडणार बांधावरील पदवीधरांच्या समस्या : विष्णुपंत भुतेकर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article