
कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत रा. से. यो. माध्यमातून कृषि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
साप्ताहिक सागर आदित्य
कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत रा. से. यो. माध्यमातून कृषि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी शिबीर जोडगव्हाण या गावात आयोजन करण्यात आले. त्यावेळेस सावंत (तालुका कृषि अधिकारी , मालेगाव), विलास वाघ ( मंडल कृषि अधिकारी, इरकर), मापारी ( कृषि पर्यवेक्षक) यांनी विद्यार्थांना कृषि विषयक चर्चासत्र व स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.
अविनाश माळशेटवार ( समाज सेवक) यांनी वाशिम जिल्ह्याच्या रौप्य महोत्सव विषयक मार्गदर्शन केले . शेख जहांगीर ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त) यांनी विद्यार्थांना नव नवीन तंत्रज्ञानाच शोध घेण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले.
त्यावेळेस कार्यक्रमाला कृषि महाविद्यालय, आमखेडा येथील प्राध्यापक डॉ. आर. एस. करंगामी, प्रा. पी.. टी. नीचळ, प्रा. एस. टी. जाधव, प्रा. ए. के. वाघ, प्रा. एम
. पी. सुरुषे, ए. डी. पुरी.(कनिष्ठ संशोधन सहाय्यक), यू. आर. पुरंदरे (कनिष्ठ संशोधन सहाय्यक), कु. के. ए. पाटील (कनिष्ठ संशोधन सहाय्यक) आणि संदेश बनसोड ( प्रयोगशाळा सहाय्यक) उपस्थित होते.
या कार्यक्रमाला गावातील शेतकरी बांधव, महिला शेतकरी विद्यार्थी व कृषि महाविद्यालय, आमखेडा येथिल विद्यार्थी_ विद्यार्थिनी उपस्थित होते
0 Response to "कृषि महाविद्यालय, आमखेडा अंतर्गत रा. से. यो. माध्यमातून कृषि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन "
Post a Comment