
जय शिवाजी – जय भारत पदयात्रेचे आयोजन: उपक्रमात सहभागी व्हावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
जय शिवाजी – जय भारत पदयात्रेचे आयोजन: उपक्रमात सहभागी व्हावे
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम, युवक हे राष्ट्राची खरी शक्ती असून देशाच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने"जय शिवाजी – जय भारत पदयात्रा" या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या पदयात्रेच्या माध्यमातून युवकांना इतिहासाची आठवण करून देत स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, कला-संस्कृती आणि सामाजिक सेवा यांसारख्या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
"जय शिवाजी – जय भारत पदयात्रा" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
उपक्रमाची सुरुवात
दि: १९ फेब्रुवारी २०२५
वेळ: सकाळी ८.३० पासून
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अकोला नाका येथे समारोप होणार आहे
उद्देश: युवकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, कला-संस्कृती आणि सामाजिक सेवेसंदर्भात जागरूकता निर्माण करणे.
कार्यक्रमातील आकर्षण:
विविध शाळा व महाविद्यालयांच्या सहभागाने रंगोली स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, नाट्यप्रयोग, पथनाट्य, पोवाडे, वेशभूषा स्पर्धा, लघुनाट्य आणि दांडिया यांसारखे विविध उपक्रम सादर केले जातील.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना सक्रिय सहभागाची विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्व संबंधीत शाळा व महाविद्यालयांनी आपआपलल्या शाळेमध्ये दि १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत
रोजी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. उदा. रांगोळी स्पर्धा, चित्रकला, श्री छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जिवनावर नाट्य, पोवाडे, वेशभुषा, वकृत्व, लेझीम, लाठीकाठी, दांडपट्टा, इत्यादी स्पर्धेचे आयोजन करून अहवाल फोटो या कार्यालयास तसेच खालील लिंकवर नोंदणी करता येईल अपलोड करावे:
https://mybharat.gov.in/pages/eventdetail?event_name=Jai-Shivaji-Jai-Bharat-Padyatra&key=66198509661
तसेच आपल्या वाशिम जिल्ह्यातील सर्व युवा व क्रीडा पुरस्करार्थी, युवा मंडळे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी,
शैक्षणीक संस्था, स्थानिक शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटना, संस्था, युवक वर्ग, जेष्ठ नागरीक, एनसीसी, एन एस एस,
स्कॉउड गाईड, होमगार्ड, यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवुन आपला सहभाग नोंदवावा.
सहभाग नोंदणी :
https://mybharat.gov.in/pages/eventdetail?event_name=Jai-Shivaji-Jai-Bharat-Padyatra&key=66198509661
नोंदवता येईल.
असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या उपक्रमाद्वारे युवकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी जोडून त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
0 Response to "जय शिवाजी – जय भारत पदयात्रेचे आयोजन: उपक्रमात सहभागी व्हावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन"
Post a Comment