
सनराईज ज्युनियर कॉलेज नागरतास मालेगाव येथे नेताजी सुभाष चंद्र बोस , बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
सनराईज ज्युनियर कॉलेज नागरतास मालेगाव येथे नेताजी सुभाष चंद्र बोस , बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
सनराईज ज्युनिअर कॉलेज मालेगाव या ठिकाणी नेताजी सुभाष चंद्र बोस तसेच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य प्रा.सदानंद सुर्वे तसेच प्रा. सिद्धार्थ भालेराव, प्रा बालाजी गवळी, प्रा. मयूरी देवळे कार्यक्रमाला उपस्थित होते .त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कु.प्रतीक्षा इंगळे कु.वैष्णवी गोरे कु. पायल बशिरे कु. निकिता वानखेडे, ओम ढोबळे, महादेव गावंडे ,अनिकेत चौधरी , यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. सदानंद सुर्वे यांनी नेताजीच्या जीवनावर प्रकाश टाकीत आजच्या तरुण युवकांनी नेताजींचे विचार स्वतःमध्ये रुजवावे देशाच्या विकासामध्ये आपले योगदान द्यावे. असे संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सिद्धार्थ भालेराव यांनी पार पाडले
0 Response to "सनराईज ज्युनियर कॉलेज नागरतास मालेगाव येथे नेताजी सुभाष चंद्र बोस , बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी"
Post a Comment