भारत प्राथमिक मराठी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
रिसोड : येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका किरणताई दुबे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, "शिवाजी महाराजांनी वैयक्तिक महत्वकांक्षेतून नाही तर अन्यायकारी परकीय सत्तांच्या गुलामगिरीतून सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज आदर्श पुत्र, कुशल संघटक, लोकल्याणकारी प्रशासक म्हणून मानवी सद्गुणांचे प्रतीक होते."यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील पोवाडे, गीते गायली; तसेच भाषणेसुद्धा केली.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक पंजाबराव देशमुख, शिक्षिका ज्योतीताई दुबे आदी मन्यावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रवी कांगणे यांनी केले.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी "
Post a Comment