महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनीला वाशिमकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद
साप्ताहिक सागर आदित्य
महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनीला वाशिमकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद
विविध वस्तू, मसाले विक्रीसाठी उपलब्ध ; ३० स्टॅाल्सची उभारणी
वाशिम : महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत शहरातील विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे आयोजित महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनीला वाशिमकरांचा उत्स्फूर्त मिळत आहे.
या प्रदर्शनीत महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, मसाले, खाद्यपदार्थ, घरगुती उपयोगातील पदार्थ खरेदी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी लोकसंचालित साधन केंद्राचे ३० स्टॅाल्स उभारण्यात आले आहेत.
या प्रदर्शनीला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देवून महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन माविमने केले आहे.
0 Response to "महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनीला वाशिमकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद"
Post a Comment