
बालविकास प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल वापसी आंदोलन.
साप्ताहिक सागर आदित्य
बालविकास प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल वापसी आंदोलन. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/ बालवाडी कर्मचारी संघटना आयटक च्या वतीने पूर्व सूचना म्हणून मोबाईल वापरण्याचे निवेदन दिले होते परंतु कार्यालयात तीन वाजेपर्यंत कोणीही उपस्थित नव्हते बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित नव्हत्या.तीन नंतर विस्तार अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित झाले. सुपरवायझर यांनी बाहेर येऊन संघटनेला सांगितले की कार्यालयातच काय परंतु आवारात सुद्धा मोबाईल ठेवू नका संघटनेच्या वतीने सेविका आक्रमक झाल्या आम्ही मोबाईल वापस दिलेल्या शिवाय परत जाणार नाही असा पवित्रा घेतला. विस्तार अधिकारी यांच्या टेबलवर दीडशे मोबाईल जमा करण्यात आले आंदोलन सविता इंगळे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात करण्यात आले . आंदोलनाला मालती राठोड, पार्वती रोकडे, अंजू वानखडे, मोहाळे ताई, जोगदंड ताई, ह्य व इतर 150 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या
0 Response to "बालविकास प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल वापसी आंदोलन. "
Post a Comment