
वाचन प्रेरणा दिनानिमित्त अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाचे वाचन.
साप्ताहिक सागर आदित्य
वाचन प्रेरणा दिनानिमित्त अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाचे वाचन.
वाशीम: श्री तुळशीरामजी कला व विज्ञान महाविद्यालय वाशिम मराठी भाषा अभ्यास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचा औचित्य साधून बहुचर्चित अशा अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाचे वाचन करण्यात आले यामध्ये 'अस्वस्थ तांडा' या या कथासंग्रहाचे लेखक डॉ. विजय जाधव हे आहेत . कथासंग्रहातील कथांचे वाचन विद्यार्थ्यांनी केलं त्यामध्ये दिवाळी कथेचे वाचन मोनिका गोरे यांनी केले 'दप्तर खुंटीला' राणी वानखडे टाकले आहे अस्वस्थ तांडा 'मंगेश सोळंके या कथेचे वाचन यांनी केले चुराडा' हर्षदा उकडे यांनी ही कथा वाचली' गर्भपात ' मंगेश सोळंके यांनी ही कथा वाचली कस्तुरी 'अजय कवर यांनी ही कथा वाचली 'हळद ' वैष्णवी गोरे ही कथा वाचली चिरकांडी' दिपाली बयस हिने ही कथा वाचली. तेजू काळे हिने दिवाळी कथा वाचली. कीर्ती वायदंडे येणे दणका ही कथा वाचली. एड्स कथा भारती इंगोले वाचली . आतला दश ही कथा अक्षरा सरकटे हिने या कथेचे वाचन केले . इत्यादी कथांचा वाचन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला ज्यांच मार्गदर्शन मिळालं आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉक्टर पद्मानंद तायडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर संतोष इंगोले हे होते तर संगीत विभागाचे सर प्रा.चंदेल सर उपस्थित होते डॉक्टर पद्मनांत तायडे यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले डॉक्टर इंगोले यांनी विद्यार्थी दशेत अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय करून देत त्यांचा संघर्ष जीवनाचा प्रवास सांगितला . प्राध्यापक चंदेल यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या प्राध्यापक अवचार यांनी केले. आणि कथा किती परिणामकारक आहे याचे महत्त्व सांगितले वाचनाने साहित्यापर्यंत पोहोचता येते. असेही सांगितले आणि वाचन दिनानिमित्त अस्वस्थ तांडा या डॉ.विजय जाधव यांच्या कथासंग्रहाचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता ढाले या विद्यार्थिनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रुक्के यांची उपस्थिती होती. प्रा. गोदारा प्रा. ढवारे या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती दिपाली भैस हर्षदा उकडे भारती इंगोले ,तेजू काळे ,वैष्णवी गोरे ,मोनिका गोरे, राणी वानखेडे इत्यादींचे सहकार्य कार्यक्रमाला लाभलं
0 Response to "वाचन प्रेरणा दिनानिमित्त अस्वस्थ तांडा या कथासंग्रहाचे वाचन."
Post a Comment