
आज विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा
साप्ताहिक सागर आदित्य
आज विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, यांचे निर्देशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधिज्ञ मंडळ, व जिल्हाधिकारी कार्यालय, यांचे संयुक्त विद्यमाने दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी १२.३० वाजता वाटाणे लॉन, अकोला रोड, वाशिम येथे विधी सेवा महाशिबीर व शासकिय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई व न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांचीउपस्थिती लाभणार आहे.
या महाशिबीर व मेळाव्यामध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांचेमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना मोफत विधी सेवा, वैकल्पिक वाद निवारण, मनोधैर्य योजना, पिडीतांना नुकसान भरपाई योजन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणा-या सर्व शासकिय विभागांमार्फत राबविण्यात येणा-या विविध शासकीय योजनांची माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड, आरोग्य कार्ड काढण्या करीता व वैद्यकीय तपासणी तसेच लाभार्थ्यांना योजनांचे लाभ देण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम व सर्व शासकिय विभागांचे स्टॉल असणार आहेत.
या शिबिरामध्ये जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
तरी सर्व जनतेने सदर विधी सेवा महाशिबीर व मेळाव्याकरीता बहुसंख्येने उपस्थित राहून शासकिय योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ, जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
0 Response to "आज विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा"
Post a Comment