
महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचे मंजुरी पत्र प्रधानमंत्री ग्रामिण आवास योजनेला गती
साप्ताहिक सागर आदित्य
महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचे मंजुरी पत्र
प्रधानमंत्री ग्रामिण आवास योजनेला गती
वाशिम दि 20
केंद्रीय गृहमंत्री. अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गीरीश महाजन यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान वाशिम येथे 45 हजार 192 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश- पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
शनिवारी (दि. 22) पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वाशिम जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ४५ हजार १९२ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात येणार असुन यापैकी 13 हजार लाभार्थ्यांना यापुर्वीच पहिल्या हफ्त्याचे वितरण केले असुन या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते २४,६०४ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांना आणखी तीन लाभ मिळणार:
म. गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेतून ९० दिवसाच्या मजुरीचा लाभ देण्यात येणा आहे. यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला नाही अशा घरकुल धारकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२,००० रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. तसेच पं. दीनदयाल उपाध्याय योजनेतून १ लाख रुपये जागा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करत असून, राज्य शासनाने उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरात लवकर हप्ते वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक जानेवारी 2025 पासून राज्यात महाआवास अभियान सुरू झाले असून या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून आपल्या हक्काचे घर मिळवावे.
-किरण गणेश कोवे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
दिनांक 22 फेब्रुवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांसह ग्रामस्थांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
-वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना मिळणार घरकुलाचे मंजुरी पत्र प्रधानमंत्री ग्रामिण आवास योजनेला गती "
Post a Comment