-->

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

मुंबई दि 18: येत्या 22 तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. 

एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी 22 ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल.

वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत

Related Posts

0 Response to "राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article