
क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा
साप्ताहिक सागर आदित्य
क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी
निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा
वाशिम, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्टपूर्तीसाठी या योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्य हा आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे.
या उपक्रमाअंतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक सहकारी,उद्योगक्षेत्र निवडून आलेले लोकप्रतिनिधी, वैयक्तिक व सामाजिक संस्था क्षयरुग्णांना सहाय्य देऊन मदत करुन आपण निक्षय मित्र बनू शकतात.
९ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला आहे.यामध्ये निक्षय मित्र बनून त्यांच्यावतीने क्षयरुग्णांना १ ते ३ वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येऊ शकतो.जिल्हयात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र बनवून सहकार्य करावे.जिल्हयात इंडियन रेड क्रॉस सोसायटी वाशिम, लॉयन्स क्लब वाशिम,सत्य साई सेवा समिती वाशिम,ईलाईट फॅमिली असोसिएशन वाशिम,संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था तोंडगाव,स्व.शिवलालजी झंवर स्मृती प्रित्यर्थ झंवर परीवार रिसोड, स्व.गीताबाई शंकरलालजी साबू स्मुती प्रित्यर्थ डॉ रमेशचंद्र साबू,जयराम नाईक मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था सुदी,नर्मदा सॉल्व्हेक्स प्रायव्हेट लिमिटेड वाशिम,अकबानी इंटरप्राइजेस कारंजा,साईप्रसाद मेडिकल मंगरुळपीर,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे व जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे यांनी जिल्हयातील ३८० क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे.
जिल्हयातील निक्षय मित्र होण्याचा मान आतापर्यंत ३० निक्षय मित्रांनी नोंदणी करून मिळविला आहे.जिल्हयात एकुण ९०८ क्षयरुण सध्या उपचारावर आहेत.यातील ३८० क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे.तरी या मोहिमेत आपण तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहाय्य म्हणून सहभाग नोंदवावा.सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन अथवा dtomhwsm@rntcp.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल किंवा https://communitysupport.nikshay.in या संकेतस्थवर लॉगीन करुन निक्षय मित्र म्हणून नोंदणी करता येईल.जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत समाजातील सामाजिक कार्यकर्ते,संस्था, औद्योगिक संस्था,संघटना यांना क्षयरुणांना पोषण आहार देण्यासाठी निक्षय मित्र म्हणून पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.त्याला दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे.क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था,व्यक्ती पुढे येतात आणि सहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी पुढे यावे.सामाजिक बांधिलकी जपत क्षयरुग्णांचे ‘निक्षय मित्र’ व्हावे,असे आवाहन जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभणकर यांनी केले आहे.
0 Response to "क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा"
Post a Comment