पार्डी एकबुर्जी येथे पोलिओ डोज ला प्रतिसाद
साप्ताहिक सागर आदित्य/
पार्डी एकबुर्जी येथे पोलिओ डोज ला प्रतिसाद
वाशिम - २७ फेब्रुवारी पोलिओ रविवार आयोजन करण्यात आले होते. २७ फेब्रुवारी पोलिओ रविवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असून त्याच अनुषंगाने आज पोलिओ रविवार हा उत्साहात साजरा करण्यात आला आहे.० ते ५ वर्षातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून आपल्या बालकाला पोलिओ विषाणू पासून निरोगी राहतील. यावेळी अंगणवाडी सेविका वंदना पडघान, युवा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (भारत सरकार) राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षक बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा मंडळाचे प्रदीप पट्टेबहादूर, आशा स्वयंसेविका छाया सरकटे,अंगणवाडी मदतनीस वंदना पडघन उपस्थित होते. या पोलिओ शिबिराला भरघोस असा प्रतिसाद लाभला आसुन यावेळी गावातील बालकांना व इतरही बालकांना पोलिओचा डोस देऊन टोटल ४५ बालकांना पोलिओची लस देण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका वंदना पडघान बोलताना म्हणाले की पोलिओच्या विषाणूंचा परिपाक काल आठ दिवसांचा असतो. सौम्य डोकेदुखी, सर्दी, ताप, अन्नावरची वासना उडणे, उलट्या होणे, हगवण व अस्वस्थता ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. सुरुवातीला शरीराचे तापमान हळूहळू वाढत जाऊन दोन-तीन दिवसांनी ताप येतो. हा ताप एकदम खाली येतो. ज्या व्यक्तीला पोलिओच्या विषाणूंची बाधा होते त्या प्रत्येक व्यक्तीला पक्षाघात होतोच, असे नाही. ८०% पेक्षा अधिक रुग्ण जे पोलिओच्या विषाणूंनी बाधित होतात, ते तीन-चार दिवसांत पूर्ववत होतात. परंतु जेव्हा रोगाचे स्वरूप तीव्र असते तेव्हा रुग्ण चिडखोर बनतो, त्याची पाठ व इतर अवयव दुखू लागतात, स्नायू दुबळे होतात आणि मान ताठ होते. पोलिओच्या विषाणूंमुळे जेव्हा मेरुरज्जूतील प्रेरक चेतापेशींचा नाश होतो, तेव्हा पक्षाघात होतो. हातपाय, उदर, मध्यपटल, श्रोणी या अवयवांच्या हालचाली प्रेरक चेतापेशी नियंत्रित करतात. या पेशींची हानी होत असल्यामुळे पक्षाघात होतो. हा पोलिओचा सामान्य पक्षाघात समजला जातो. ज्या चेतापेशी नाश पावतात त्यांची जागा भरून काढली जात नाही कारण चेतापेशींचे पुनर्जनन होत नाही. मात्र, ज्या चेतापेशींची गंभीर हानी झालेली नसते, त्या पूर्वीप्रमाणे काम करू शकतात. या यावेळी ; प्रदीप पट्टेबहादुर बोलताना म्हणाले की ग्रामीण भागासह इतरही दुर्बळ व पालक बांधून राहणाऱ्या व झोपडपट्टी तथा आदिवासी भागांमध्ये पोलिओचे डोस जास्तीत जास्त प्रमाणे पोहोचले पाहिजे त्यामधील जनजागृतीची भावना जागविण्याची गरज असून देशातील कुठलेच बालक पोलिओचे शिकार झाले नाही पाहिजे.. पोलिओ आजारापासून दूर व निरोगी राहिले पाहिजे..!
यावेळी अंगणवाडी सेविका वंदना पडघाण आशा स्वयंसेविका छाया सरकटे अंगणवाडी मदतनीस.
0 Response to "पार्डी एकबुर्जी येथे पोलिओ डोज ला प्रतिसाद"
Post a Comment