बसस्थानक कारंजा येथे जागतिक मराठी राजभाषा गौरव दिनाचे आयोजन !
साप्ताहिक सागर आदित्य/
बसस्थानक कारंजा येथे जागतिक मराठी राजभाषा गौरव दिनाचे आयोजन !
कारंजा (लाड) : स्थानिक कारंजा आगार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसस्थानक प्रशासनाच्या वतीने, जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, ज्ञानगंगा साहित्य मंडळ वाशिम जिल्हाध्यक्ष - डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त असलेले ओंकारराव मलवळकर हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून, महाराष्ट्र शासनाचे व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आरिफभाई पोपटे, दैनिक लोकमतचे माजी तालुका प्रतिनिधी कचरूलालजी गटागट, सर्व पत्रकार जिनवर तायडे, बंडू इंगोले, गणेश बागडे, धनंजय राठोड,सौ उषाताई नाईक, कालूभाई तवंगर, उमेश अनासाने, अब्दुल अलिम, शेख हफीज, ज्ञानेश्वर शिंदे, मोहम्मद मुन्निवाले तथा प्रवासी मावशी आघाव मावशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती . यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष ओंकार मलवळकर तथा बसस्थानक सहाय्यक वाहतुक अधिक्षक प्रविण डायलकर यांनी, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते मराठी कविवर्य स्व. कुसूमाग्रज उपाख्य वि वा शिरवाडकर यांचे प्रतिमेचे पूजन व हारार्पण केले . त्यानंतर प्रास्ताविक व संचलन संजय कडोळे यांनी करून, " मराठी बांधवानी मराठी मायबोली असलेल्या राजभाषेचा स्वाभिमान बाळगण्याची उपस्थितांना शपथ दिली . आपल्या मनोगतातून ज्येष्ठ पत्रकार आरिफभाई पोपटे यांनी, "इतर राज्यातील नागरीक ज्याप्रमाणे आपल्या मातृभाषेचा आदर करून हटवादी असतात तसेच आपणही आपल्या मराठी भाषेविषयी जागृत राहून मराठी व्यवहार करण्यास सुचविले . बंडू इंगोले, गणेश बागडे, के एम गटागट यांनी आपआपले मराठी विचार मांडले . याप्रसंगी प्रवाशी असलेल्या आघाव मावशींचा आदरपूर्वक गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला . तसेच सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक अनिल मानके, वाहतुक नियंत्रक संजय भिवकर, सहाय्यक संजय काशिकर, विवेक अलोणे यांनी उपस्थित पत्रकारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले . अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप वाहतुक अधिक्षक प्रविण डायलकर यांनी केला .
0 Response to "बसस्थानक कारंजा येथे जागतिक मराठी राजभाषा गौरव दिनाचे आयोजन !"
Post a Comment