'द बर्निंग ट्रक'चा थरार:हिंगोली ते सेनगाव मार्गावर 'द बर्निंग ट्रक'चा थरार, प्रसंगावधान राखून चालकाने मारली उडी
साप्ताहिक सागर आदित्य/
'द बर्निंग ट्रक'चा थरार:हिंगोली ते सेनगाव मार्गावर 'द बर्निंग ट्रक'चा थरार, प्रसंगावधान राखून चालकाने मारली उडी
हिंगोली - हिंगोली ते सेनगाव या राज्य मार्गावर सेनगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या तोष्णीवाल महाविद्यालयाजवळ शनिवारी सकाळी दहा वाजता द बर्निंग ट्रकचा थरार घडला. ट्रकला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने ट्रक थांबवून उडी मारली. ट्रकमधील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदरील आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
प्रसंगावधान राखून चालकाने मारली उडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विटांनी भरलेला ट्रक (MH26 H 5964) सेनगावकडून हिंगोलीकडे येत होता. यावेळी सेनगाव शहराजवळ अचानक ट्रकला आग लागली, बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केले. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक थांबवून ट्रकमधून उडी मारली.
या घटनेची माहिती मिळताच सेनगांव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक गणेश राठोड, जमादार महादू शिंदे, अनिल भारती यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच सेनगाव येथील अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकला लागलेली आग वेळीच नियंत्रणात आणली. या आगीत केबिनसह ट्रॅक चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
0 Response to "'द बर्निंग ट्रक'चा थरार:हिंगोली ते सेनगाव मार्गावर 'द बर्निंग ट्रक'चा थरार, प्रसंगावधान राखून चालकाने मारली उडी"
Post a Comment