महिलांनी शिक्षणासाठी बाहेर पडावं - उपविभागीय अधिकारी राहुल जाधव
साप्तहिक सागर आदित्य/
महिलांनी शिक्षणासाठी बाहेर पडावं - उपविभागीय अधिकारी राहुल जाधव
कारंजा लाड - भुतकाळात महिलांना शिक्षणाचा फारसा अधिकार नव्हता पण आज वर्तमान मध्ये परिस्थिती बदलली आहे त्यामुळे महिलांनी शिक्षणासाठी बाहेर पडण्याचं धाडस करावं असे आवाहन उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
पुढे बोलताना राहुल जाधव साहेब म्हणाले की महिला जर शिक्षीत झाल्या तर विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांना निश्चित मिळेल . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार धीरज मांजरे , पत्रकार गोपाल पाटील भोयर , सुधीर देशपांडे व तौसिफ मामदानी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अॅड संदेश जैन जिंतुरकर म्हणाले की पुर्वी च्या काळात महिलांना संयुक्त कुटुंब पध्दती, रुढी परंपरा आदि कारणांमुळे शिक्षणाचा अधिकार मिळाला नाही पण आज महिला सर्व प्रकारच्या रुढी परंपरा झुगारून शिक्षण घेत असुन विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील महिला शिक्षणासाठी बाहेर पडत आहे हि आनंदाची बाब आहे हि परंपरा भविष्यातही अशीच सुरू राहिली पाहिजे असे प्रतिपादन संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी केले.
ह्यावेळी पत्रकार गोपाल पाटील भोयर , सुधीर भाऊ देशपांडे , संजय कडोळे , अस्लम मामदाणी , नसीरोद्दीन खतीब , डॉ इस्तियाक अली ह्यांनी आपले मनोगत व्यक्तकरताना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मुस्लिम समाजातील बांधवांचा गौरव करुन संस्थेच्या माध्यमातून भविष्यात सर्वच समाजातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बांधवांचा सत्कार करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर अमरावती विद्यापीठातुन इंग्रजी विभागात पहिली मेरीट आलेल्या गोल्ड मेडॅलिस्ट हुमेरा ज. इकबाल खान ह्यांनी इंग्रजी तुन आपले मनोगत व्यक्त केले.
ह्यावेळी हुमेरा ज.इकबाल खांन , वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त डॉ अदनान अली इस्तियाक अली , पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आल्यामुळे अब्दुल आसीम अब्दुल राजिक तर इयत्ता 10 वी मध्ये 98.60 % गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तमन्ना फिरदोस हाजी अब्दुल अनिस ह्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ह्यावेळी ज्ञानगंगा साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे ह्यांचे हस्ते सर्व सत्कार मुर्तींचा ज्ञानमुर्तीं पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इमरान शेख तर आभार प्रदर्शन अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येंने नागरिक, पत्रकार बांधव व युवा वर्ग उपस्थित होते.
0 Response to "महिलांनी शिक्षणासाठी बाहेर पडावं - उपविभागीय अधिकारी राहुल जाधव "
Post a Comment