क्षणचित्रे
साप्ताहिक सागर आदित्य/
क्षणचित्रे : सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे उपस्थितीत त्यांचे शुभाशिर्वादाने, महाराष्ट्राचे तत्कालिन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, ना . राजकुमारजी बडोले यांचे द्वारा दि .3 फेब्रु.2019 रोजी, चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या, व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात, सत्यपाल महाराजांचे शिष्य, गोंधळसम्राट लोककलावंत, ज्ञानगंगा साहित्य मंडळ कारंजाचे संस्थापक अध्यक्ष तथा साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे यांना, महाराष्ट्र शासनाचा, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता . त्यावेळी महाराजांनी संजय कडोळे यांचेशी चर्चा करीत त्यांचे आवर्जून अभिनंदन केले होते . याप्रसंगी उमेश अनासाने यांचे सह नेहरूनगर, मोठी उमरी,अकोला येथील जय बजरंग व्यायाम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपभाऊ सोनोने उपस्थित होते .
0 Response to "क्षणचित्रे"
Post a Comment