विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा चाचा नेहरू बालमहोत्सव जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हाधिकाऱ्यांचे प्रेरणादायी आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा चाचा नेहरू बालमहोत्सव
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रेरणादायी आवाहन
चाचा नेहरू बालमहोत्सवाचे थाटात उद्घाटन
वाशिम, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व कौशल्य विकासावर भर देऊन खेळांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.
महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने १५ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पी.एम. जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण संजय गणवीर, योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव , नागरीबाल विकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे,गट शिक्षण अधिकारी अनिल पवार, विस्तार अधिकारी तुषार जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्याचे आवाहन केले. संजय गणवीर, गजानन डाबेराव, आणि मिनाक्षी भस्मे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी चांगला अभ्यास करून योग्य अधिकारी होण्याचा आणि देशाचा चांगला नागरिक बनण्याचा संदेश दिला.
स्पर्धांचा उत्साह :
कबड्डी, धावणे, गोळाफेक, लांब उडी, खो-खो यांसारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले व बाल संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे यांनी केले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिकारी, कर्मचारी, शाळेचे शिक्षक, आणि बालगृहांचे अधीक्षक यांनी पुढाकार घेतला.
0 Response to "विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा चाचा नेहरू बालमहोत्सव जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हाधिकाऱ्यांचे प्रेरणादायी आवाहन"
Post a Comment