
भूमिपुत्र व उदयगीरी नेत्र रूग्णालया कडुन अंधमुक्त गांव संकल्प
भूमिपुत्र व उदयगीरी नेत्र रूग्णालया कडुन अंधमुक्त गांव संकल्प
रिसोड - भूमिपुत्र शेतकरी संघटना व उदयगीरी नेत्र रूग्णालय उदगिर यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड तालुक्यातील अडवळणाचे गांव आसलेल्या गोहगांव हाडे या गावची निवड अंधमुक्त गांव या संकल्पने व्दारे करण्यात आली आहे. दिवंगत सुभाष राऊत यांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त श्रीमती आशा राऊत यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक 27 डिसेंबर ला गोहगाव येथे सकाळी दहा वाजता अंधमुक्त गांव या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. प्रकल्पामध्ये गावातील शंभर टक्के नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व नेत्र शस्त्रक्रिया करणे तथा डोळयांच्या सर्व प्रकारच्या अजारांचे निदान करून त्यावर कमीत कमी खर्चात गांवातच उपाय योजना व औषधोपचार करणे या बीबींचा समावेश होतो. वाशिम जिल्ह्य़ातील या प्रकल्पा अंतर्गत हे पहिलेच गांव निवडले आसुन पुढील काळात इतरही गांवात हा प्रकल्प राबविण्यात येणार आसल्याचे भूमिपुत्र कडुन कळविण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर हे राहणार आसुन कार्यक्रमाच्या अध्यक्ष रिसोड प.स. सभापती केशरबाई दिनकरराव हाडे ह्या राहणार आहेत. नेत्र तपासणीसाठी व उपचारासाठी प्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉ. धनंजय तनपुरे (एम. एस. पुणे) याची सेवा लाभणार आसल्याची माहीती शिबीर संयोजक तथा विष्णुपंत भुतेकर मित्र परिवाराचे अध्यक्ष महाविर पवार यांनी कळविले आहे.
0 Response to "भूमिपुत्र व उदयगीरी नेत्र रूग्णालया कडुन अंधमुक्त गांव संकल्प"
Post a Comment