-->

संत गजानन महाराजांचा प्रगटोत्सव कारंजात आनंदोत्सव म्हणून साजरा

संत गजानन महाराजांचा प्रगटोत्सव कारंजात आनंदोत्सव म्हणून साजरा


साप्ताहिक सागर आदित्य

संत गजानन महाराजांचा प्रगटोत्सव कारंजात आनंदोत्सव म्हणून साजरा 

कारंजा : स्थानिक प्रशासनाचा आदेश शिरसावंद्य मानून, कारंजा येथील शहरातील प्राचिन व पहिल्या, पोलिस स्टेशन आवारातील संत गजानन महाराज मंदिरासह - गजानन मंगल कार्यालय, लोकमान्य नगर, महावीर कॉलेनी, बाबरे कॉलनी, नगर परिषद कॉलेनी, तुषार कॉलनी, यशवंत कॉलनी, सहारा कॉलनी, कोहिनूर कॉलनी, देवांगन कॉलनी व संपूर्ण शहरातील प्रत्येक मंडळात - विश्वस्त, सेवाधारी व स्वयंसेवकाच्या अथक प्रयत्नाने श्रींचा वार्षिकोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.                         बुधवारी सकाळपासूनच श्री च्या भक्तांनी आपआपल्या घरासमोर, मंदिरासमोर, जलसिंचन करीत परिसर रांगोळ्यानी सुशोभित केलेला होता . तसेच श्रींच्या प्रत्येक मंदिरामध्ये आबाल वृद्धां सह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती . मंदिरामध्ये श्रींचा अभिषेक व आरती नंतर प्रसादाची पाकीटे वाटण्यात आली . काही भक्तमंडळीनी घरगुती जेवणावळीच्या प्रसादाचेही आयोजन केलेले होते . शहर पोलिस स्टेशनच्या मंदिरामध्ये दरवर्षी महाप्रसाद घेणाऱ्यांकडून प्रसादाची विचारणा होत होती . परंतु कोरोना नियमावली आणि स्थानिक प्रशासनाचे कडक निर्बंध यामुळे, प्रसादाची पाकीटे घेऊनच भक्तगण आनंदाने समाधान मानीत होते . ममतानगर येथील श्री च्या मंदिरावर, वसुंधरा टिम च्या योगशिक्षिका सौ अर्चनाताई कदम यांच्या नेतृत्वात संत गजानन महाराज प्रगटदिन आणि कर्मयोगी गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त , संपूर्ण दिवसभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले . तसेच कारंजा पोलिस स्टेशनचे ठानेदार आधारासिंग सोनोने यांनी प्रत्येक मंदिरावर चोख बंदोबस्त ठेवून श्रीचरणी आपली कर्तव्यसेवा समर्पित केली .असे प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे संजय कडोळे यांनी कळविले आहे .

 

 

Related Posts

0 Response to "संत गजानन महाराजांचा प्रगटोत्सव कारंजात आनंदोत्सव म्हणून साजरा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article