लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता व बंदोबस्त या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
साप्ताहिक सागर आदित्य
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता व बंदोबस्त या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील राज्यस्तरीय प्रशिक्षक (मास्टर ट्रेनर) तहसिलदार योगेश शंकरराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १२ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यत पोलीस अधिक्षक कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राम लंके, जिल्हा पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, सर्व ठाणेदार, सर्व शाखा प्रभारी अधिकारी असे एकूण ५२ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
0 Response to "लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता व बंदोबस्त या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले."
Post a Comment