
स्व. शंकर नारायण मडके यांचे मरणोत्तर नेत्रदान
साप्ताहिक सागर आदित्य
स्व. शंकर नारायण मडके यांचे मरणोत्तर नेत्रदान
स्थानिक देवपेठ ता.जि.वाशिम येथील मधुकर शंकर मडके यांचे वडिल स्व. शंकर नारायण मडके यांच्या वयाच्या ६७ व्या वर्षी दिनांक ०४/०२/२०२५ रोजी सकाळी ४.०० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण मडके कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या स्व. शंकर नारायण मडके यांचे निधन झाल्याने संपुर्ण मडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना मडके कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा हि भगवान नारायण मडके याच्यांकडे व्यक्त केली त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. आशिष बेदरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी स्व. शंकर नारायण मडके यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबुळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता गजानन प्रल्हाद राऊत, कैलास भांदुर्गे, विठठल ढगे, सुहास मडके, प्रविण मडके, शोभा मडके, गजानन जाधव, नितिन भांदूर्गे, सुमन भांदुर्गे, उमाबाई मडके, सिताबाई मडके व मडके कुंटुबाचे सहकार्य लाभले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे यांनी केले असून मडके कुटुंबाचे आभार मानले आहेत
नेत्रदानासाठी संपर्क 99 22 51 99 48 जिल्हा रुग्णालय वाशिम
0 Response to "स्व. शंकर नारायण मडके यांचे मरणोत्तर नेत्रदान"
Post a Comment