-->

नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे ११५ % ऊदिष्ट पुर्ण केल्यामुळे गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांचा सत्कार

नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे ११५ % ऊदिष्ट पुर्ण केल्यामुळे गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांचा सत्कार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे ११५ % ऊदिष्ट पुर्ण केल्यामुळे गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांचा सत्कार


वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील पंचायत समितिचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकुशलतेची अनोखी छाप पाडली असुन वरिष्ठांनीही प्रशासकीय कार्याची दखल घेवुन सत्कार करून सन्मानित केले आहे . नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे ११५ % काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचा वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस तसेच लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सत्कार करून सन्मान केला . मंगरुळपीर तालुक्यातील पंचायत समितीला प्रभारीचे ग्रहण लागले होते त्यामुळे पाहिजे तसे कामे न होता विकासकामांना खिळ बसली होती . सिंचन विहीरी , घरकुल आदी योजना थंडबस्त्यात होत्या . राजकारणीही गटविकास अधिकाऱ्यांना हातचे बाहुल्याप्रमाणे नाचवत असल्याचे एकंदरीत चित्र होते त्यामुळे कामे न होता लोकांना पंचायत समितिच्या चकरा माराव्या लागत होत्या . आर्थीक हितसंबधावाल्याचेच कामे प्राधान्याने करण्याचा सपाटा होता त्यातच गटविकास अधिकारी एस पी पडघान नंतर खमक्या अधिकारी रविंद्र सोनोने यांच्या रुपात लाभल्यामुळे लोककेंद्री प्रशासनाला गती येवून गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लागायला लागले . पात्र लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनेचा लाभ मिळायला लागला . घरकुलाचेही प्रश्न सोडवलेत . त्यातच मंगरुळपीर तालुक्यात महत्वाचा आणी जिकरीचा असलेल्या सिंचन विहीरीचा प्रश्न आ वासून ऊभा होता . गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांनी लोकप्रतिनीधी जनता आणी प्रशासन असा समन्वय साधत सिंचन विहिर प्रश्न मार्गी लावत नरेगा अंतर्गतच्या सिंचन विहिरीचे ११५ % काम पुर्ण करून प्रशासनात नावलौकीक मिळवले . अशा लोकहितवादी , प्रशासनात पारदर्शी असणाऱ्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रविंद सोनोने यांच्या कामाचा सन्मान व्हावा हे गरजेचे वाटल्याने वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस तसेच वाशिम जि . प . चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे , तहसिलदार शितर बंडगर आणी मान्यवरांची सत्कार करून भेटवस्तु देवून सोनोने यांना सन्मानित केल्याने सर्वस्तरातुन त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

0 Response to "नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे ११५ % ऊदिष्ट पुर्ण केल्यामुळे गटविकास अधिकारी रविंद्र सोनोने यांचा सत्कार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article