
दर आठवडयाला विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण सहायक आयुक्त वाठ यांनी माहिती
साप्ताहिक सागर आदित्य
दर आठवडयाला विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण
सहायक आयुक्त वाठ यांनी माहिती
वाशिम, : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्या अधिनस्त एकूण 6 शासकीय वसतीगृहे आहेत. त्यापैकी कारंजा, मंगरुळपीर, वाशिम व सवड येथे मुलांचे आणि वाशिम व मंगरुळपीर येथे मुलींचे वसतीगृहे आहेत. सर्व वसतीगृहांमध्ये ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येते. गृहपाल यांचेकडून दर आठवडयाला विद्यार्थी सभा घेऊन त्यांच्या अडीअडचणीबाबत विचारणा करुन विद्यार्थ्यांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.
सहायक आयुक्त व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी हे वेळोवेळी वसतीगृहांना भेटी देतात. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यांचे निराकरण करण्यात येते. वसतीगृह भेटीदरम्यान भोजनाबाबत, स्वच्छतेबाबत व इतर सोयी सुविधांबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली असता कोणतीही तक्रार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. निर्वाह भत्ता तरतुदींचे अधिन राहून विद्यार्थ्यांना अदा करण्यात येतो. दरमहा प्रलंबित निर्वाह भत्याबाबत तरतूदीची मागणी सादर करण्यात येते. तरतूद प्राप्त होताच त्याप्रमाणात निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना अदा करण्यात येतो. आवश्यक सोयी सुविधांबाबत वरीष्ठ कार्यालयास वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. ऑनलाईन व्हीसी तसेच आढावा बैठकीच्या माध्यमातून शासकीय वसतीगृहांचे सर्व गृहपाल यांना भोजन, सोयी सुविधा व निर्वाह भत्ता तसेच स्वच्छतेबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्याचे वाठ यांनी सांगितले.
0 Response to "दर आठवडयाला विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण सहायक आयुक्त वाठ यांनी माहिती"
Post a Comment