
कृ.उ.बा. समीत्या आणि ग्रामपंचायती बाबतचा निर्णय स्वागत योग्य विष्णुपंत भुतेकर
साप्ताहिक सागर आदित्य
कृ.उ.बा. समीत्या आणि ग्रामपंचायती बाबतचा निर्णय स्वागत योग्य
विष्णुपंत भुतेकर
संस्थापक अध्यक्ष
भूमिपुत्र
शेतकरी संघटना
शिंदे आणि फडणवीस दोघांच्या सरकारने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत पदाधिकारी निवडीचा अधिकार सातबारा धारक शेतकऱ्यांना देणे व ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचाची थेट निवड जनतेतून करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. हा निर्णय एतीहासीक व शेतकरीभिमुख निर्णय असल्याची प्रतीक्रीया भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी कळविली आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार (काही अपवाद वगळता) समीत्या हया कार्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुरण बनलेल्या आहेत. एकदा सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदारसंघातुन निवडून गेल्यानंतर संचालकना शेतकऱ्यांचा विसर पडायचा कारण निवडुण येण्या साठी प्रत्यक्ष शेतकरी मतदार नसायचा . शेतकऱ्यांचे जि.म.सह. बॅकेचे कर्जदार म्हणजेच गावातील सेवा सह संस्थेचे सभासद ज्यांना संचालक निवडायचे ते संचालक कृ. उ. बा. समीतीला मतदार आसायचे. शेतकऱ्यांची संस्था आसुनही कृ.उ.बा. समीतीत शेतकरी उपरा झाला होता. आनेक वर्षापासून मुळ उद्देशालाच हारताळ फासल्या जात होती. अनियमिताता, भ्रष्टाचार आणि मस्तवाल पणाचे शिक्षण देणार्या कार्यशाळा म्हणजे राज्यातील कृ.उ.बा. समीत्या असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मक्तेदारी तोडुन सर्व सामान्य शेतकर्यांस केंद्र बिंदु माणुन राज्यातील सातबरा धारक शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आनन्याचा प्रयत्न शिंदे व फडणवीस सरकारने केला आहे तो वाखणन्या योग्य आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतही गटा- तटाच्या राजकारणातुन सरपंच पद बाजुला केल्या मुळे ग्रामीण भागाला व गावच्या विकासला चालना मिळुन नव युवकांना संधी मिळणार आसल्याची प्रतिक्रिया भूमिपुत्र ने दिली आहे.
0 Response to " कृ.उ.बा. समीत्या आणि ग्रामपंचायती बाबतचा निर्णय स्वागत योग्य विष्णुपंत भुतेकर"
Post a Comment