
२६ ते २८ एप्रिल महिला व बाल विकास विभागाचा क्रीडा महोत्सव
साप्ताहिक सागर आदित्य
२६ ते २८ एप्रिल
महिला व बाल विकास विभागाचा क्रीडा महोत्सव
वाशिम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत २६ ते २८ एप्रिल या कालावधीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने मंगरुळपीर तालुक्यातील कंझरा येथील वंदनाताई इंगोले बालगृह येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा महोत्सवामध्ये १०० मीटर धावणे,लांब उडी,२.५ रनिंग, फुटबॉल,खो-खो,टग ऑफ वॉर,डॉज बॉल,बॅडमिंटन,बास्केटबॉल,बोर्ड गेम्स व कॅरम इत्यादी मैदानी खेळ तसेच मनोरंजनात्मक खेळ घेण्यात येणार आहे.
बालकांनी क्रीडा महोत्सवात सहभागी व्हावे,या उद्देशाने देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
0 Response to "२६ ते २८ एप्रिल महिला व बाल विकास विभागाचा क्रीडा महोत्सव"
Post a Comment