-->

जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन

जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन

वाशिम, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने नियुक्त केले तज्ञ विधिज्ञ राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गरजुंना मोफत विधि सेवा देण्यासाठी विधी साह्य संरक्षण सल्लागार (एल. ए. डि. सि. एस) ही योजना सुरू करण्यात आली आहे.या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम येथे लोक अभिरक्षक कार्यालय स्थापीत करण्यात आले आहे.या कार्यालयाचे उद्घाटन २४ एप्रिल रोजी प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोघ कलौती यांच्या हस्ते करण्यात आले.

          अभिरक्षक कार्यालयाच्या माध्यमातून कायदेविषयक योजना राबवली जाणार आहे. गरजू व गरिब लोकांना यांचा लाभ मिळणार आहे. 

      याकरीता लोक अभिरक्षक म्हणून निवड करण्यात आली असून 

मुख्य लोक अभिरक्षक म्हणून ऍड.परमेश्वर शेळके,उपमुख्य लोक अभिरक्षक ऍड. वर्षा रामटेके आणि सहायक लोक भिरक्षक म्हणून ऍड. अतुल पंचवटकर,ऍड.हेमंत इंगोले, ऍड. शुभांगी खडसे,ऍड.राहूल पुरोहित या सहा विधीज्ञांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधि

प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार निवड केली आहे.या विधिज्ञांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मोफत विधी सेवा व सल्ला दिला जाणार आहे.

0 Response to "जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article