-->

पावसाळयाच्या दिवसात कोंबडया व पशुधन  व्यवस्थापनाबाबत दक्षता घ्या

पावसाळयाच्या दिवसात कोंबडया व पशुधन व्यवस्थापनाबाबत दक्षता घ्या

 


साप्ताहिक सागर आदित्य 

पावसाळयाच्या दिवसात कोंबडया व पशुधन

व्यवस्थापनाबाबत दक्षता घ्या

वाशिम,  : पावसाळयात आणि अतिवृष्टी, गारपिट, वीज पडणे व पुरपरिस्थिती या आपदामध्ये पशुधनाची घ्यावयाची काळजी यासाठी वेळीच नियोजन शक्य होण्यासाठी वेळोवेळी प्रसिध्द होणाऱ्या हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवावे. त्यानुसार तयारी करावी. सर्व पशुपालकांनी सतर्क असावे. तसेच शासनाच्या व केंद्र शासनाच्या वेळोवेळी काढण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. पावसाळयात अनुकुल वातावरणामुळे विविध रोग जंतुची वाढ झपाटयाने होत असते, यासाठी पशुधनाची व त्यांचा निवारा, चारा, खाद्य व पाणी यांची जैवसुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. निवारा शक्यतो कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. नविन हिरव्या चाऱ्यामुळे हगवण तसेच एचसीएन व नायट्रेट विषबाधा, हायपोमॅग्नेशियमीक टिटॅनी या सारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे कापणी योग्य स्थितीतील चाऱ्याचा वापर करावा. वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता ठेवावी. तो भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पशुधनाला अतिवृष्टीच्या कालावधीत चरावयास सोडू नये, बहुतांश वेळी पशुधन अतिवृष्टीमुळे श्वसनसंस्थेच्या आजाराने मुत्युमुखी पडतात. पिण्याच्या पाण्याच्या हौदाची स्वच्छता करावी. शेवाळ जमलेले असल्यास काढून टाकावे. हौदास चुना लावुन घ्यावा. पावसाळयापुर्वी पशुधनास जंतनाशक औषध दयावी. साथरोगांचा व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुंचे लसीकरण करुन घ्यावे. शेण व लेंडयाच्या विल्हेवाटीसाठी शेणखताचा खड्डा असावा. अतिवृष्टी झालेल्या सर्व भागामध्ये घटसर्प रोगाचा प्रादुर्भाव उदभवू नये यासाठी या रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करण्यात यावे. आपत्तीच्यावेळी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस त्वरीत संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्हि.एन. वानखडे यांनी कळविले आहे.


                                                                                                                                         

Related Posts

0 Response to "पावसाळयाच्या दिवसात कोंबडया व पशुधन व्यवस्थापनाबाबत दक्षता घ्या"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article