
नागरिकांनो ! पूरपरिस्थितीत खबरदारी घ्या जिल्हा प्रशासनाचे आवाहन २३ ते २५ जुलै येलो अलर्ट
साप्ताहिक सागर आदित्य
नागरिकांनो ! पूरपरिस्थितीत खबरदारी घ्या
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
२३ ते २५ जुलै येलो अलर्ट
वाशिम,भारतीय हवामान विभाग,नागपूर यांनी आज २२ जूलै रोजी जिल्हासाठी ऑरेंज अलर्ट तसेच २३ ते २५ जूलैपर्यंत येलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. जिल्हयात पावसाची संततधार सुरू असल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा अंदाज घेऊनच लोकांनी कामकाजाचे नियोजन करावे.नदी-नाल्यांना पुर आल्यास त्याठिकाणी नागरीक,महिला व लहान मुलांनी पुलावरुन रस्ता ओलांडू नये. नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्यांचे ठिकाणी जाण्याचे टाळावे.कोणीही मासेमारी करण्यास तलाव,धरण किंवा नदयामध्ये जाऊ नये.पुराच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुरपरिस्थितीत काय करावे
पूर परिस्थितीत उंच ठिकाणी जावे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.गावात / घरात जंतुनाशके असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पूरासंदर्भात पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी हलवावी.
पूरपरिस्थितीत उद्भवल्यास काय करू नये
पूर असलेल्या भागात विनाकारण भटकू नये.पुराच्या पाण्यात चुकूनही जावू नये. दुषित / उघड्यावरचे अन्न, पाणी टाळावे.पुलावरुन पाणी वाहत असतांना पूल ओलांडू नये.असे निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी कळविले आहे.
0 Response to "नागरिकांनो ! पूरपरिस्थितीत खबरदारी घ्या जिल्हा प्रशासनाचे आवाहन २३ ते २५ जुलै येलो अलर्ट"
Post a Comment